स्वामींनी मंगळसूत्राचे असे महत्त्व सांगितले नक्की पहा

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो स्वामी समर्थ महाराजांनी मंगळसूत्र बद्दल बोलत असताना मंगळसूत्राचे काही महत्त्व सांगितले आहे. मंगळसूत्र हे सौभाग्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे.भारतीय संस्कृती नुसार मंगळसूत्र हे लग्न झाल्यानंतरच स्त्रिया परिधान करत असतात. मंगळसूत्र हे पत्ती वरील प्रेम व आदराचे लक्षण आहे.पति वर कोणतेही संकट येऊ नये म्हणून स्त्रिया मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये घालतात आणि मंगळसूत्र परिधान केल्यामुळे सर्व संकटे दूर पळूनजातात.
मंगळसूत्र हे दोन पदरी तोऱ्यामध्ये काया महिन्यांनी आलेले असते.

व त्यामध्ये चार मनी व दोन वाट्या असतात 2 पदरी दोरा म्हणजे पती-पत्नीमधील बंधन होय.आणि दोन वाट्या म्हणजे स्वतः दोघे पती-पत्नी व चार महिने म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. मंगळसूत्र व काळे मणी याचा अध्यात्मिक अर्थ स्वामी समर्थ महाराज यांनी आपल्याला सांगितले आहे.मंगळसूत्र मधील वाट्या आहे. त्यातील एक वाटी शिवाची व एक वाटी शक्तीची असे ओळखले जाते. शिवशक्ती च्या बळावरच सासरच्या मंडळींचे रक्षण आणि त्यांचा सांभाळ करायचा असतो.

दोन वाट्या गोपनारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून सासरच्या कुलदेवीची उपासना करण्याची परवानगी दिली आहे.एका वाटीत हळद व एका वाटीत कुंकू घालून त्याची विधी युक्त पूजा करून मंगळसूत्र गळ्यामध्ये बांधतात मंगळसूत्र हे वैवाहिक स्त्रीचा सर्वात महत्वाचा व मोठा दागिना आहे.सूत्र हे सौभाग्याचं लेणं असल्यामुळे त्या स्त्रिया लग्नानंतर हे मंगळसूत्र परिधान करतात. व पतीच्या मृत्यूनंतरच ते मंगळसूत्र त्या स्त्रिया गळ्यातून काढतात. व ते समर्पित करतात.किंवा पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्या स्त्रिया ते मंगळसूत्र गळ्यातून बाजूला काढतात. मंगळसूत्र हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पण त्याचे महत्त्व प्रत्येक राज्यामध्ये एक सारखेच आहे.

मंगळसूत्राची लांबी पोटापर्यंत असावी कारण अनहत चक्र हे पोटावर असते. मंगळसूत्राच्या वाट्या त्या अनहत चक्राला स्पर्श झाल्या पाहिजेत.त्यामुळे स्त्रियांचे मन चित्त शांत राहते. त्या चक्र मधून स्त्रियांना आध्यात्मिक शक्ती मिळत असते. आणि त्याचा संपूर्ण प्रभाव त्या घरावर पडत असतो. अशाप्रकारे स्वामी महाराजांनी मंगळसूत्राचे महत्व पटवून सांगितले आहे. प्रत्येक स्त्रियांचे सौभाग्याचे लेणे हे मणी मंगळसूत्र असते लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दिवशी तिचा पती त्या मंगळसूत्राच्या वाट्या मध्ये हळदीकुंकू भरतात. व देवा, ब्राह्मण समोर तसेच अग्नी समोर ते आपल्या पत्नीच्या गळ्यात बांधा व एकमेकांना सदैव साथ देण्याची शपथ घेतात लांबसडक मंगळसूत्र परिधान केल्याने पतीचे आयुष्य वाढते.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधार एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आमच्या पेज ला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *