नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो २०२२ हे नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि या नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी २१ जानेवारीला शुक्रवारच्या दिवशी आली आहे. मित्रांनो आपल्यातील बरेच जण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास आणि व्रत करत असतात, आम्ही फक्त या दिवशी उपवास करतात आणि सायंकाळच्या वेळी चंद्रोदय झाल्यानंतरच श्रीगणेशाची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतरच उपवास सोडत असतो.
मित्रांनो आज आपण संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेश यांना प्रसन्न करणारा उपाय व संकष्टी दिवशी श्री गणेश यांची पूजा कशा पद्धतीने करायची आहे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण श्री गणेश यांच्या मूर्तीची विधिवतपणे पूजा करून श्री गणेश यांना लाल रंगाची फुले अर्पण केले तर यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याच बरोबर श्रीगणेश आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी येथे श्रीगणेशाची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर जर तुमच्या काही इच्छा अपुर्ण राहील्या असतील आणि त्या पूर्ण करत असताना समस्या येत असतील,
तर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी परंतु गणेश मूर्तीची पूजा करावी पार्थिव गणेश मूर्ती म्हणजे कोणत्याही धार्मिक स्थळ किंवा तीर्थक्षेत्र वरून आपल्याला माती घेऊन यायची आहे आणि त्याची श्री गणेशाची मूर्ती तयार करायची आहे आणि त्या मूर्तीची संकष्टीच्या दिवशी पूजा आणि आरती करायची आहे, यामुळे तुमचे अपूर्ण राहिलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि तुमच्या मनातील इच्छा ही पूर्ण होतील.
मित्रांनो गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपल्याला दूर्वा आणि लाल रंगाची फुले त्यांना अर्पण करायचे आहेत कारण गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल रंगाची फुले ही प्रिय आहेत आणि आपण जर ही फुले आणि दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केली आणि त्यांच्याकडे मनापासून प्रार्थना केली तर गणपती बाप्पा लगेच आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात त्याचबरोबर श्री गणेश यांना विघ्नहर्ता देखील म्हटले आहे कारण ते आपल्या जीवनामध्ये आलेल्या सर्व विग्नापासून आपले संरक्षण करत असतात.
श्रीगणेशांना जास्वंदाची फुले खुप आवडत असतात त्यामुळे आपण त्यांची पूजा करत असताना शक्यतो जास्वंदाच्या फुलांचा वापर करावा आणि जर तुम्हाला जास्वंदाची फुले मिळाले नाहीत तर तुम्ही झेंडूची फुले ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशांना अर्पण करू शकता त्याचबरोबर श्री गणेश अण्णा प्रसाद म्हणून कोणताही गोड पदार्थ केला तरी चालेल आणि जर तुम्हाला गोड पदार्थ करणे शक्य नसेल तर तुम्ही छोटासा गुळाचा खडा देतील श्रीगणेशांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता.