नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्यातील अनेक जण श्री गणेश यांची अगदी मनापासून भक्ती करत असतात. हे लोक श्री गणेश यांची दररोज नित्य नियमाने पुजा,अर्चा आणि त्यांच्या मंत्राचा जप करत असतात. त्याच बरोबर प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश यांचे व्रत अगदी मनापासून करत असतात, आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळच्या वेळी चंद्रोदय झाल्यानंतर श्रीगणेश यांची पूजा करून त्यांची आरती करून त्यांना गोड नैवेद्य दाखवून मगच आपण केलेला उपवास सोडत असतात.
मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थीला येत असतात त्यातील एक विनायक चतुर्थी आणि दुसरी संकष्टी चतुर्थी आपल्यातील अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थी चा उपवास आणि व्रत अगदी मनोभावे करत असतात, त्याचबरोबर आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करते त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत असतात आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व विघ्नापासून देतील त्याची सुटका करत असतात.
आपल्यातील कोणत्याही वयाची व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे हे व्रत करू शकते आणि हे व्रत केल्यानंतर आपल्याला त्याचे त्वरित फळ देखील मिळत असते. मित्रांनो विशेषता मंगळवारच्या दिवशी आलेले संकष्टी चतुर्थी आणि श्रावण महिन्यात तील संकष्टी चतुर्थी यांचे विशेष महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितले गेले आहे जर आपण अगदी मनापासून या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत व उपवास आणि श्री गणेशाची आराधना केली तर त्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतात.
आपल्या हिंदू धर्मशास्त्रात असे सांगितले आहे की ज्या ही व्यक्तीला संकष्टी चतुर्थीचे हे व्रत करायचे आहे त्या व्यक्तीने श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासून हे करण्यास सुरुवात करावी त्यानंतर कमीतकमी २१ संकष्टी चतुर्थी व्रत करावे आणि त्यानंतरच त्याचे उद्यापन करावे पण मित्रांनो आपल्यातील अनेक जण इच्छा पूर्ण होईपर्यंत हे व्रत करत असतात त्याचप्रमाणे काहीजण आयुष्यभर के व्रत करण्याचा निर्णय देखील घेत असतात.
मित्रांनो हे व्रत का करावे?यामागे नेमके कारण आणि त्याचा इतिहास काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. यामागे एक मोठे कारण आहे आम्ही या मग ची कथा अत्यंत रोचक सुद्धा आहे.
मित्रांनो एकदा श्री गणेश आणि त्यांचे वाहन असलेला उंदीर एका ठिकाणी जात होते त्यावेळी त्या उंदराचा तोल जाऊन ते दोघेही खाली पडले आणि त्यानंतर चंद्र त्यांच्याकडे पाहून जोरजोरात हसू लागला. चंद्र आपल्याकडे पाहून हसतोय हे कळाल्यावर श्री गणेशाना खूप राग आला आणि त्यानंतर श्री गणेश यांनी चंद्राला शाप दिला की इथून पुढे कोणीही तुझं तोंड देखील बघणार नाही आम्ही जो कोणी तुझ तोंड पाहील त्याच्यावर खोटा आळ येईल, त्यानंतर चंद्र ही घाबरला आणि त्याने मोठी तपश्चर्या करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले.
चंद्राच्या तपश्चर्यामुळे आणि सर्व देवी-देवतांना श्री गणेशाकडे प्रार्थना केल्यामुळे श्री गणेशा मी चंद्राला त्यांनी दिलेल्या श्रापातून मुक्त केले, परंतु वर्षातून एक दिवस म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणीही तुझं तोंड पाहणार नाही आणि जर चुकून एखाद्याने या दिवशी तुझं तोंड पाहिलं तर त्या वर्षांमध्ये त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल. त्यानंतर चंद्राने गणपती बाप्पांना विचारले की जर चुकून एखाद्या व्यक्तीने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर त्याने खोटा आळ येऊ नये म्हणून कोणता उपाय करावा.
त्यावर श्री गणेश म्हणाले की त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे, हे व्रत केल्यामुळे त्याच्यावर खोटा आळ येणार नाही. मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये असं सांगितला आहे कि गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीकृष्णांनी चंद्राचे तोंड पाहिलं होतं त्यामुळे त्यांच्यावर मौल्यवान मोती चोरल्याचा आळ देखील आला होता आणि तो खोटा आळ घालवण्यासाठी त्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते,
तर मित्रांनो संकष्टी चतुर्थी व्रत आणि उपवास करणे मागचे नेमके कारण हे होते.