नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो काही दिवसांपूर्वीच आपण मकर संक्रांति हा नवीन वर्षातील पहिला सण अगदी उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. मित्रांनो मकर संक्रांतीच्या वेळी अनेक विवाहित महिला एकमेकांच्या घरी हळदी कुंकू च्या कार्यक्रमासाठी जात असतात मित्रांनो हा हळदी कुंकू चा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालणार आहे. या काळामध्ये विवाहित महिला एकमेकांच्या घरी हळदीकुंकू साठी जात असतात आणि एकमेकींना वेगवेगळ्या वस्तू भेट स्वरूपात देत असतात मित्रांनो ही पारंपरिक प्रथा आपण अनेक वर्षांपासून साजरी करत आहोत.
पण मित्रांनो हळदीकुंकूचा कार्यक्रम झाल्यानंतर महिला एकमेकांना स्वरूपात वाण देत असतात त्यावेळी त्यांना कोणती भेट वस्तू वाण म्हणून द्यावी हा मोठा प्रश्न पडलेला असतो. परंतु मित्रांनो जी काही भेटवस्तू आपण वान म्हणून एखाद्या सुवासिनीला देत असतो ते आपल्या इच्छेनुसार त्याचबरोबर आर्थिक परिस्थितीनुसार आपण वाण म्हणून दिली पाहिजे. मित्रांनो आपल्या सर्व शास्त्रांमध्ये ज्याच्या वस्तू वाण म्हणून देणे योग्य मानली आहे त्या वस्तूंबद्दल सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो धर्मशास्त्रानुसार तुम्ही घरी हळदीकुंकू साठी आलेल्या सुवासिनींना टिकल्याची डब्बी किंवा कुंकू ठेवण्याची डबी भेट म्हणून दिली तर ते अगदी शुभ मानले जाते त्याचबरोबर तुम्ही दिवे हळदीकुंकू ठेवण्यासाठी असणारे पात्र अशा वस्तू सुद्धा वाण म्हणून सुवासिनींना देऊ शकता. मित्रांनो या सर्व वस्तू देणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही महिला आपला शृंगार करताना ज्या वस्तू वापरतात त्या वस्तू जरी दिल्या तरीही चालेल मग त्या वस्तूंमध्ये मेहंदीचे कोन, टिकल्याची डब्बी किंवा इतर कोणतेही मेकअपचे सामान दिले तरी चालेल.
मित्रांनो रोजच्या वस्तूंप्रमाणे तुम्ही सुहासने महिलांना वाण म्हणून खाद्य पदार्थ किंवा मिठाई सुद्धा देऊ शकता, यामध्ये तुम्ही चॉकलेट्स पेढे किंवा लाडू त्या सुवासिनींना खाऊ घालू शकता आणि भेट म्हणूनही देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही गुळाची छोटी ढेप दुकानातून विकत आणू शकता आणि त्यातील थोडे थोडे गोड प्रत्येक सुवासिनीला प्रसाद म्हणून किंवा भेट म्हणून देऊ शकता. गुळा बरोबरच तुम्ही कडधान्याची पाकिटे ही त्या महिलांना भेट म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही घरांमध्येच धान्य एका पाकीट मध्ये पॅक करून ते त्या महिलांना दिले तरीही चालेल.
मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरी हळदीकुंकू ला आलेल्या महिलांना तिळाचे लाडू वाण म्हणून किंवा प्रसाद म्हणून दिले तर शास्त्रानुसार हे अधिक शुभ मानले गेले आहे.मित्रांनो तुम्हाला आवडणारी कोणतीही वस्तू तुमच्या इच्छेने घरामध्ये हळदीकुंकूसाठी आलेल्या महिलांना भेट म्हणून किंवा वाण म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही महिलांना बांगड्या गळ्यातील हार कानातील किंवा नाकातील नथ भेट म्हणून देऊ शकता.
मित्रांनो आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच आपल्याला आपल्या घरांमध्ये आलेल्या सुवासिनींना वाण म्हणून भेटवस्तू द्यायची आहे.