नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रानो गुरुवार म्हणजे स्वामींचा वार असतो. विशिष्ट सेवा या गुरुवारी केल्या जातात म्हणूनच कोणत्याही केंद्रात किंवा मठात स्वामींचे विशेष कार्यक्रम आयोजन केलेले असतात. तुम्ही जर दररोज स्वामींची सेवा करत असाल तर हे एक काम तुम्ही गुरुवारी करा. स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर होईल.
जसा स्वामींना गुरुवार आवडतो त्याचप्रमाणे स्वामींना गोड पदार्थ देखील खूप आवडतात. म्हणूनच पुरणपोळी, शिरा, खीर असा गोड पदार्थांचा नैवेद्य स्वामींना अवश्य दाखवावा. मठात किंवा केंद्रांमध्ये देखील स्वामींना नैवेद्य दाखवताना एखादा गोड पदार्थ नक्की दाखवतात.
त्यामुळे तुम्ही देखील जर स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवत असाल तर गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस नाही जमले तर एका वेळेस तरी एखादा गोड पदार्थ नैवेद्याच्या ताटामध्ये असावा. तो नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे. कोणाला पुरणपोळी जमत असेल तर पुरणपोळी. पुरणपोळी जमत नसेल तर कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून असावा.
जर तुम्हाला काहीच गोड करायला जमत नसेल तर दूध आणि त्यामध्ये चिमूटभर साखर घालून ते दूध साखरेचा नैवेद्य आपण नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवावे व त्याचा नैवेद्य दाखवावा किंवा एका वाटीत चिमूटभर साखर तरी नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवावी. तर मित्रांनो गुरुवारी जर तुम्ही एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामींना दाखविला तर स्वामी प्रसन्न होतील.
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ते पूर्ण करतील. ज्यांना जमेल त्यांनी हा नैवेद्य दाखवावा. कारण नैवेद्य हा स्वामी खात नसतात तर तो आपणच खात असतो. परंतु जर स्वामींची कृपादृष्टी जर आपल्यावर व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर दर गुरुवारी संध्याकाळी किंवा सकाळी नैवेद्याच्या ताटामध्ये गोड पदार्थ अवश्य ठेवा. त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.