नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो, राम भक्त हनुमानाची भक्ती केल्याने चमत्कारिक रुपाने सर्व संकटे दूर होऊन भक्तांना शांती आणि आनंद मिळतो. ज्ञानी असे म्हणतात की एकदा हनुमानाच्या भक्तीचा आस्वाद घेतला आयुष्यात कधीही पराभूत होत नाही. तो आयुष्यात हरत असताना देखील शेवटी जिंकतोच. अशा भाविकांचा कोणीही शत्रू नसतो.
ज्या घरात हनुमानाचे चित्र असते त्या घरात मंगळ, शनि, पितृ आणि भुताचे दोष नसतात. हनुमानाचे भक्त आहे तर हनुमानाचे चित्र घरात खूप आणि कशा प्रकारे लावावे हे जाणून घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे. तर चला आज आम्ही आपल्याला सांगत आहोत.
हनुमानाचे चित्र लावायचे काय नियम आहेत? ते चित्र कुठे आणि कसे लावावे हे आधी जाणून घेणार आहोत….. मित्रांनो,दक्षिणेकडे मुख असलेले हनुमानाचे चित्र लावावे. कारण हनुमानाने आपले सर्वात जास्त प्रभाव या दिशेला दाखवलेले आहे. हनुमानाचे चित्र या दिशेला लावल्याने दक्षिणेकडून येणारी प्रत्येक वाईट शक्ती हनुमानाला बघून परत जाते यामुळे घरात सौख्य आणि समृद्धी नांदते.
शयनकक्षात हनुमान चित्र लावू नये. शास्त्रानुसार हनुमान हे ब्रह्मचारी आहेत आणि या कारणास्तव व त्यांचे चित्र शयनकक्षात न लावता घरातील देवघरात किंवा इतर कोणत्याही पवित्र जागी ठेवावे. हे शुभ ठरत.हनुमानाचे शक्तिप्रदर्शन करतानाचे चित्र लावावे भूतबाधांपासून वाचण्यासाठी आणि जर आपल्याला असे वाटत आहे घरात नकारात्मक शक्तींचा वास झाला आहे तर घरात हनुमानाचे शक्तिप्रदर्शन करीत असल्याचे चित्र लावावे.
घरात पंचमुखी हनुमानाचे चित्र देखील प्रवेशद्वारावर किंवा अशा ठिकाणी लावू शकता जिथून ते सर्वांना दिसून येईल. असे केल्याने घरात कोणती वाईट शक्ती शिरकाव करणार नाही.वास्तू ज्ञानानुसार पंचमुखी हनुमानाची मूर्ती ज्या घरात असते तिथे प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि संपत्तीत वाढ होते.
घरात एखाद्या चुकीच्या दिशेने पाण्याचे स्तोत्र असल्याने वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे कुटुंबात शत्रूचे त्रास आजारपण आणि मतभेद दिसून येतात. हे वास्तू दोष दूर करण्यासाठी त्या घरात असे पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे. ज्यांचे मूख त्या पाण्याच्या स्तोत्रा कडे बघताना असेल.
मित्रांनो, बैठकीच्या खोलीत श्रीरामाच्या दरबाराचे चित्र लावावे. हनुमान प्रभू श्रीरामाच्या पायाशी बसलेले आहे. या व्यतिरिक्त बैठकीच्या खोलीत पंचमुखी हनुमानाचे चित्र हनुमानाचे डोंगर उचलताना चित्र किंवा श्री रामाचे भजन करताना चे चित्र देखील लावू शकता. लक्षात असू द्या त्यापैकी कोणते एकच चित्र आपल्याला लावायचे आहे.
डोंगर उचलताना हनुमानाचे चित्र लावावे. हे चित्र घरात असल्याने घरातील माणसांमध्ये धैर्य सामर्थ्य विश्वास आणि जबाबदारी विकसित होते. माणूस कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही. असं केल्याने परिस्थिती आपल्याला लहान दिसेल आणि त्याचे निराकरण त्वरित अस होईल.
मित्रांनो, उडत असलेल्या हनुमानाचे चित्र घरात लावल्याने आपल्याला प्रगती आणि यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपल्याला पुढे वाढण्यासाठी प्रगती करण्यासाठी उत्साह आणि धैर्याचा संचार होईल. याने आणि त्यामुळे आपण सतत यशाच्या मार्गावर वाटचाल कराल.
तसेच प्रभू श्रीरामाचे भजन करतानाचे चित्र लावावे चित्र आपल्या घरात आहे तर आपल्या मध्ये भक्ती आणि एक विश्वास निर्माण होईल हे भक्ती आणि विश्वास आपल्याला जीवनातील यशाचे आधार आहे.
मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला सतत भेट देत रहा. आणि आपल्या प्रियजनांच्या माहितीसाठी ही माहिती शेअर करायला विसरू नका.वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.