नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, घरातील भांडणतंटे यामुळे घरचे वातावरण आनंदमय कधीच राहत नाही. वाद विवाद यामुळे अनेक आजारांना देखील आपल्याला सामोरे जावे लागते. तर घरातील वाद-विवाद, तंटे, कटकटी संपवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय, मंत्राचा जप, पूजा, विधी करीत असतो. परंतु त्याचा कोणताही प्रभाव न झाल्याने आपण कायमच चिंतित राहात असतो. आपल्यापैकी अनेक जण हे स्वामींचे भक्त आहेत. अगदी मनोभावे अनेक जण स्वामींचे स्त्रोत, मंत्र जाप, पूजा करीत असतात.
असेच काही शब्द मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे. जेणेकरून तुमच्या घरातील कटकटी कायमच्या निघून जाऊन स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर कायम राहील. तुम्ही मंत्र जाप एक वेळेस, 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 108 वेळेस केला तरी चालेल. चला तर मग स्वामींचा हा शक्तिशाली मंत्र पाहूया.
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
या मंत्राचा जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता. जेव्हा तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी. संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी. स्वामींच्या फोटो समोर बसून हा जप तुम्ही एक वेळेस, अकरा वेळेस किंवा 108 वेळेस देखील केला तरी चालेल.
तुमच्या क्षमतेनुसार, शक्तीनुसार तुम्ही हा मंत्र जाप करायचा आहे. परंतु हा मंत्रजाप अगदी श्रद्धेने, मनोभावाने करा. जेणेकरून स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या घरातील सर्व वादविवाद, तंटे पूर्णपणे नष्ट होतील आणि घरात कायम आनंदी वातावरण राहील. तर मित्रांनो घरातील कटकटी दूर व्हाव्यात असे जर वाटत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.