नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, संक्रांत म्हंटले की, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला भेटतो. मकरसंक्रांतीचा हा सण हिंदू धर्मामध्ये खूपच आनंदाने साजरा केला जातो. या मकर संक्रांति दिवशी घरातील महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. अनेक सुवासिनी महिलांची ओटी या मकर संक्रांति दिवशी भरली जाते. अनेक महिला आपल्या इच्छेने अनेक वस्तूंचे वाण एकमेकांना देत असतात.
तर मित्रांनो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम चालतो. या हळदीकुंकवासाठी जे काही तुम्ही वाण देणार असाल या वस्तू मध्ये काही अशा वस्तू आहेत की, त्या चुकूनही तुम्ही कोणत्याही सुवासिनीला वाण म्हणून द्यायचे नाही. अनेक महिलांना याविषयी माहिती नसते व त्या महिला या वस्तूंची देवाणघेवाण करतात. तर मित्रांनो चला तर मग पाहूया त्या अशा कोणत्या वस्तू आहेत की, ज्या हळदीकुंकवाच्या वेळी वान म्हणून द्यायच्या नाहीत.
मित्रांनो, वान म्हणून कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू देऊ नयेत. अलीकडच्या काळात अनेक महिला प्लास्टिकच्या वस्तूंचे वाण देतात. परंतु या वस्तूचे वान म्हणून तुम्ही दिले तर त्याचा खूप वाईट परिणाम आपल्या कुटुंबाला सहन करावा लागतो. त्यामुळे मित्रांनो वाण म्हणून कधीही प्लास्टिकच्या वस्तू देऊ नयेत.
दुसरी वस्तू म्हणजे चाकू, सुरी अशा धारदार वस्तूंचे वाण म्हणून कधीच सुवासिनी महिलांना देऊ नये. त्यामुळे आपल्यावर शत्रुपीडा कायम राहते. अनेक महिला अशा वस्तूंचे वाण देतात परंतु जर आपण हे वान दुसऱ्या महिलांना दिले तर त्याचा परिणाम हा आपल्यावरच होतो म्हणजेच आपल्या घरात अशांती निर्माण होते.
तसेच मित्रांनो अलीकडच्या काळात मनी प्लांट चे वाण देणे हे खूपच गाजलेले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु मित्रांनो तुम्ही हे मनीप्लांट देत असताना आवळा किंवा आवळ्याचे रोप तुम्ही कधीच वाण म्हणून द्यायचे नाही. आवळ्याच्या झाडामध्ये श्री विष्णू व लक्ष्मी हे वास करीत असतात. हे रोप वाण म्हणून दिल्यानंतर आपल्या घरांमध्ये भांडणे चालू होतात घरांमध्ये अशांती राहते.
हे रोप वान म्हणून दुसऱ्या महिलेला दिले तर साक्षात लक्ष्मी त्या महिलेच्या घरात प्रवेश करेल व आपल्या घरातून निघून जाईल. तर मित्रांनो आवळा हे आयुर्वेदिक असले तरीदेखील आवळ्याचे रोप हे कधीही वाण म्हणून देऊ नका. इतर कोणत्याही प्रकारच्या फुलांचे किंवा फळांचे रोप तुम्ही वान म्हणून देऊ शकता.
तर मित्रांनो वरील माहिती सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील जर तुमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवणार असाल आणि वाण म्हणून वस्तू देणार असाल तर कोणत्याही प्रकारच्या धान्याचे तुम्ही वान देऊ शकता. परंतु वरील माहिती सांगितलेल्या वस्तूंचे कधीच वाण देऊ नका.
मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला फॉलो करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.