मांजर एकसारखे आपल्या घरामध्ये येत असेल तर शुभ की अशुभ ?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्या हिंदू शास्त्रानुसार वेगवेगळे शास्त्र आहेत. आम्ही या शास्त्रांवर बऱ्याच जणांनी अभ्यास करून प्रत्येकाने आपापली मते मांडली आहेत. परंतु नारद पुराणानुसार आपल्या घरामध्ये मांजर सारखे सारखे येत असेल, तर ते येणे शुभ आहे की अशुभ आहे याची माहिती आजच्या लेखामध्ये आपण घेणार आहोत. आपल्यातील बऱ्याच जणांना हे माहित देखील आहे. व आपले वाडवडील आपल्याला कायम सांग देखील असतात एखादे मांजर आडवे जाणे हे अशुभ असते. कारण आपण ज्या कामासाठी घराबाहेर पडलो आहे. ते काम मांजर आडवे गेल्यामुळे पूर्ण होणार नाही.

त्यामुळे मांजर आडवे जाणे चांगले मानले जात नाही. ज्यावेळी मांजर आपल्या आडवे जाते. त्यावेळी थोडावेळ तेथे थांबावे मगच पुढे जावे. असे आपल्याला आपले वाडवडील सांगतात मित्रांनो घरामध्ये मांजर पाळणे चांगले असते. परंतु अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपल्याला अशुभ ठरू शकतात. मांजराचा रडण्याचा आवाज ऐकू येणे हे चांगले नाही. मांजर मायाळू हे असतेच परंतु ते लवकर रागीट देखील होते मांजराची आक्रमण करण्याची क्षमता फार मोठी असते. त्याचबरोबर ते चाफळ देखील असते. नारद पुराणानुसार आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त जर मांजर येत असेल तर ते काहीतरी अपशकुन होणार आहे याचे संकेत आहेत.

असे देखील समजले जाते की एकापेक्षा जास्त जर मांजर आपल्या घरामध्ये येत असतील तर कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतात. घरातील आजारपण निघून जात नाही कोणी ना कोणी सतत आजारी राहते. नारद पुराणानुसार मांजराच्या भांडणाचा आवाज सारखा सारखा जर आपल्याला येत असेल तर आपल्या घरांमध्ये देखील अशाच प्रकारे भांडण होण्याची शक्यता असते. आणि या मांजरांच्या भांडणामुळे आपल्या घरातील शांतता भंग होते. जर मांजर आपल्या घरातील दूध चोरून पित असेल तर आपल्या घरावर आर्थिक संकट येणार आहे. याची जाणीव ठेवली पाहिजे.

नारद पुराणानुसार घरामध्ये मांजर पाळणे अशुभ आहे असे सांगितलेले नाही. परंतु आपल्याला बरेच जण सांगतात की मांजर पाळणे हे अशुभ असते. त्यामुळे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घरामध्ये मांजर पाडू शकतात. परंतु वरील सांगितल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टी होऊ नयेत. याची मांजर पळत असताना आपल्याला खबरदारी घ्यायला हवी. कारण मांजराने जर आपल्या घरातील दूध चोरून पिले तर आपली आर्थिक भरभराटी होणार नाही. आपले नुकसानच होणार आहे. पैशाची कमतरता जाणवणार आहे.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्र केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *