सुवासिनी कधी व कसा करावा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम? किती महिलांना बोलवावे? खूपच उपयुक्त अशी माहिती नक्कीच जाणून घ्या

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदी कुंकवास फार महत्त्वाचे स्थान दिले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आपल्या घरी ठेवतात. अगदी आनंदाने मकरसंक्रांतीचा म्हणजेच सौभाग्याचा हा सण साजरा केला जातो. वर्षाचा हा पहिला सण असतो. अनेक महिला या दिवशी आपल्या घरी सुवासिनींना बोलावून त्यांची ओटी भरत असतात. या दिवशी ओवसा देखील पुजला जातो.

मकर संक्रांतीच्या हळदीकुंकवास खुप विशेष असे स्थान आहे. अनेक महिला आपल्या मर्जीने अनेक सुवासिनी महिलांना वाण देतात. आपल्या घरी बोलावून आपल्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम त्या अगदी आनंदाने करीत असतात. तर मित्रांनो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण कोणत्याही दिवशी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आपल्या घरी ठेवू शकतो. आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही वारी हा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि आपल्या इच्छेनुसार कितीही सुवासिनींची तुम्हाला ओटी भरायची आहे म्हणजेच 1,2,7,9 किंवा अकरा कितीही सुवासिनींची तुम्ही ओटी भरू शकता. ते आपल्या मर्जीवर असते.

अनेक महिला सुवासिनी स्त्रियाना वाण देखील देतात.वान देणे जमत नसेल तर फक्त सुवासिनींची ओटी देखील भरू शकता. आपल्या घरी सुवासिनींना बोलावून त्यांना हळदीकुंकू लावायचे आहे. नंतर त्यांना चहा किंवा दूध द्यायचे आहे किंवा जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्यांना नाश्ता देखील तुम्ही देऊ शकता व त्यानंतर त्या महिलेची तुम्हाला ओटी भरायची आहे. वाण द्यायचे आहे.

तर मित्रांनो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कोणताही एक दिवस तुमच्या इच्छेने निवडा आणि सुवासिनींची ओटी नक्की भरा. कारण मकर संक्रांतीचा हा दिवस खूपच शुभ कारक मानला जातो. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीचा जो काही काळ आहे तो खूपच शुभकारक मानला जातो. याला विशेष असे महत्त्व आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कोणत्याही एका दिवशी सुवासिनींची ओटी अवश्य भरा.

मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला फॉलो करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *