मकर संक्रांति पासून ते रथसप्तमीपर्यंत विवाहित महिलांनी आपल्या आईची ओटी भरावी; खूपच उपयुक्त अशी माहिती नक्की जाणून घ्या

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, 14 जानेवारी शुक्रवारच्या दिवशी मकर संक्रांती आलेली आहे. मकर संक्रांतीचा दिवस विवाहित स्त्रियांसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुवासिनी आपल्या सौभाग्यासाठी मनोभावे व श्रद्धेने पूजा विधी करीत असतात. मकर संक्रांति दिवशी तिळगुळ वाटण्याचा देखील कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळतो. प्रत्येकाशी नाते संबंध प्रेमाचे रहावे हा त्यामागचा हेतू असतो.

या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ओवसा देखील पूजन करतात. मकर संक्रांति पासून महिलांचा हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास सुरुवात होते. हा कार्यक्रम 21 जानेवारी म्हणजेच रथसप्तमीपर्यंत केला जातो. या 14 ते 21 जानेवारीपर्यंत अनेक वस्तूंचे वाण देण्याचा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी अगदी आनंदाने साजरा केला जातो. अनेक महिला वेगवेगळ्या प्रकारचे वाण महिलांना देतात.

तर मित्रांनो या मकर संक्रांति पासून काही महिला विवाहित स्त्रियांच्या ओटी देखील भरतात. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही आपल्या आईची ओटी भरायची आहे. आईची ओटी भरल्याने आपल्या घरात सुख-समृद्धी, ऐश्वर्य नांदेल. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. आपल्या आईचा आशीर्वाद आपल्याला भेटेल. मुलीचे व आईचे नाते संबंध अगदीच घट्ट बनेल.

ज्यांना कोणाला आई नसेल त्यांनी आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे किंवा आपल्या देवघरात ज्या कोणत्या देवीची मूर्ती असेल त्या देवीची ओटी भरायची आहे. ओटी कशी भरायची? हे आपण पाहूया. ओटी भरण्यासाठी तुम्ही साडी खरेदी करू शकता किंवा ब्लाउज पीस देखील खरेदी करू शकता. एक नारळ घ्यायचा आहे तसेच अकरा रुपये किंवा एकवीस रुपये दक्षिणा म्हणून घ्यायचे आहे. गहू किंवा तांदुळ घ्यायचे आहे आणि ओटी भरायची आहे.

जर तुम्ही देवीची ओटी भरत असाल तर ओटी भरून झाल्यानंतर ओटी भरलेले साहित्य आहे ते साहित्य ज्या महिलेने ओटी भरलेली आहे त्या महिलेने घ्यायचे आहे. आणि जर तुम्ही आपल्या आईची ओटी भरली असेल तर ओटीचे साहित्य आई पाशी ठेवायचे आहे म्हणजेच आईने ते वापरायचे आहे. तर मित्रांनो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही कोणत्याही एका दिवशी आपल्या आईची ओटी अवश्य भरा. जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. तुमचे घर कायम आनंदात राहील.

मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.