नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो शरीरावरील वेगवेगळ्या ठिकाणे असणाऱ्या तिळाचे वेगवेगळे महत्त्व आहे. तीळ आपले सौंदर्य वाढवते त्याचबरोबर सुख-समृद्धी आनंद या गोष्टींचे तिळाचा संबंध असतो काही लोक तिळाला शुभ मानतात तर काही लोक तिळामध्ये चमकणारे भाग्य शोधत असतात. परंतु आपल्या शरीरावरील प्रत्येक तीळ आपल्याला काहीतरी सांगत असते. हे मात्र खरं चला तर मग जाणून घेऊया आपल्या शरीरावरील कोण कोणत्या ठिकाणी तीळ आहे. आणि तीळ आपल्याला आपल्या नशिबा बद्दल काय सांगते याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये आपण घेणार आहोत. शरीरावरील प्रत्येक वेळेला वेगवेगळे महत्त्व आहे.
प्रत्येकांच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी तिळा असतात. मग या काळ रंगाच्या किंवा लाल रंगाच्या ही असू शकतात. आणि याचा संबंध आपल्या नशिबाशी असतो. गालावरील तीळ आपल्या सौंदर्या मध्ये जशी भर पाडतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातील संपत्ती मध्ये भर पाडतो. ज्यांच्या नाकावर तीळ आहे त्या व्यक्ती खूपच शिस्तबद्ध असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष स्पष्ट देखील करावा लागतो. ज्या व्यक्तींच्या नाकाच्या खालच्या बाजूला तीळ आहे, त्यांचे बरेच प्रेमी असतात. मात्र अशा व्यक्ती कमी लोकांची जोडलेल्या असतात. आणि ज्यांच्या कपाळावर तीळ आहे त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये खूप संघर्ष करावा लागतो.
जर एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या मध्यभागी तीळ असेल तर त्यांना खूप समृद्धी मिळते. आणि ज्या व्यक्तींच्या बोटांवर असतो. त्या व्यक्ती दुर्देवी मानल्या जातात. व ज्यांच्या पायाच्या तळव्याला तीळ असते त्या व्यक्ती सदैव घरापासून लांब राहतात. मात्र यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते. ज्या व्यक्तींच्या छातीवर तीळ आहे. त्या व्यक्तीस कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यांच्या पोटावर तीळ आहे त्या व्यक्तींना पैसे भरपूर मिळतात. मात्र त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही. जर आपल्या शरीरावर कोणत्याही ठिकाणी तीळ असेल आणि त्या तिळावर केस असल्यास ते खूप शुभ मानले जाते. मात्र शरीरावर असणार्या तिळा गडद रंगाच्या असेल तर आयुष्यामध्ये मोठ्या अडचणी येऊ शकतात.
फिकट किंवा हलक्या रंगाचा तीळ खूप शुभ असतो. ज्योतिष शास्त्रानुसार शरीरावरील लाल तीळला स्वतःचे असे महत्त्व असते. व ते त्याच्या उपस्थिती नुसार त्याचे फळ त्या व्यक्तीला देत असते. शरीरावरील लाल तीळ समृद्धी आणि दुर्दैव या दोन्ही चे प्रतीक असते. जर हे तीळ तोंडावर असेल तर कौटुंबिक व वैवाहिक जीवनामध्ये कलह दर्शवत असतात. हा ते जर हातावर असेल तर आर्थिक पाठबळ मिळते आणि छातीवर असेल, तर त्या व्यक्ती परदेशामध्ये जळतात छातीवरील तीळ जर लाल रंगाची असेल तर भरपूर पैसा कमवण्याचे लाभ यामुळे मिळतात. त्याचबरोबर पाठीवर जर लाल रंगाचा तीळ असेल तर त्या व्यक्ती सैन्यामध्ये किंवा धाडसी कृत्य करणाऱ्या क्षेत्रांमध्ये आपले नाव लवकिक करतात.
ज्योतिष शास्त्रानुसार शरीरावर 12 पेक्षा जास्त तिळा असू नये. 12 पेक्षा शरीरावर जर कमी तिळा असतील तर खूपच चांगले असते. पुरुषांच्या उजव्या हातावर तीळ असणे खूप फायदेशीर असते. तर स्त्रियांच्या डाव्या हातावरील तीळ खूप फायदेशीर असते त्याचबरोबर महिलेच्या छातीवर जर तीळ असेल तर तीळ महिला खूपच भाग्यवान म्हणावी. आणि कपाळाच्या मध्ये जर तीळ असेल तर ते शुद्ध प्रेमाचे प्रतीक असते. पोटाच्या खालची तीळ पैशाची चणचण जाणवत, तर कपाळावर डाव्या बाजूची तीळ अनावश्यक खर्च दर्शवतो. ओठांवर तीळ असलेले व्यक्ती खूपच प्रेमळ असतात. तर स्त्रियांच्या नाकावर तीळ त्यांच्या सौभाग्याचे सूचक असते.
मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.