नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो यंदाच्या २०२२ या नवीन वर्षामध्ये मकर संक्रांत १४ जानेवारी शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. हिंदू धर्म शास्त्रात असे मानले आहे की संक्रांत एक देवता आहे आणि संक्रांत देवी ज्या ज्या वस्तूंचा स्वीकार करते त्या सर्व वस्तू नाश पावतात. ज्या व्यक्तीवर संक्रांत येते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक संकटे आणि अडचणी येत असतात. अशा काही आख्यायिका तसेच जुने विचार सांगितले जातात.
तर मित्रांनो शास्त्रानुसार मकर संक्रांति दिवशी काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला चुकून ही करायच्या नाहीत. त्यामुळे आज आपण असे काही कामे बघणार आहोत ती आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायची नाहीत. यामधील सर्वात पहिली गोष्ट आहे ती मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्याही व्यक्तीला उधार पैसे व त्याचप्रमाणे मौल्यवान वस्तू उधार म्हणून वापरण्यासाठी द्यायचे नाहीत.
यामागचे कारण म्हणजे जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी एखादी वस्तू किंवा पैसे उधार म्हणून एखाद्या व्यक्तीला दिले तर ते आपल्याकडे परत येण्याची शक्यता कमी असते म्हणून संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार म्हणून देऊ नये. यापुढील गोष्ट आहे या दिवशी पुरुषांनी दाढी करू नये त्याचप्रमाणे केस कट करू नये आणि महिलांनी या दिवशी चुकूनही केस धुऊ नयेत आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर या दिवशी तुम्हाला चुकून हे आपले पिकाची कापणी करायची नाही. या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
तसेच मित्रांनो या दिवशी आपण चुकूनही अन्नाचा अपमान करू नये, आणि अन्नदेवता नाराज होईल असे कोणतेही कृत्य या दिवशी करू नये. जी व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नाचा अपमान करतील त्या व्यक्तीला भविष्यामध्ये अन्नासाठी वणवण भटकावे लागते. मित्रांनो याच बरोबर आपल्या घरामध्ये जर गाय,म्हैस असेल तर या दिवशी चुकूनही गाय,म्हैस,शेळी यांचे दूध काढू नये. आणि त्याच बरोबर या दिवशी चुकूनही कोणाबरोबर वादविवाद करू नये आणि आपल्या तोंडातून वाईट शब्द बाहेर काढू नये.
मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण एखाद्या व्यक्तीबरोबर वाद घातला किंवा आपल्या तोंडून वाईट शब्द उच्चारला गेला तरी यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होतो आणि त्याचबरोबर त्याचा नकारात्मक परिणाम हे आपल्या भाग्यावर होत असतो आणि त्यामुळे आपलं भाग्य आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहाराचे सेवन करायचे नाही आणि त्याचबरोबर मध्यपान देखील करायचे नाही आणि आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान सुद्धा आपल्याला यादिवशी करायचं नाही.
त्याचबरोबर या दिवशी जर तुमच्या घरासमोर एखादी गरजू व्यक्ती आली किंवा अपंग व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाती परत पाठवून देऊ नका तुम्हाला जितकी शक्य असेल तितकी मदत त्या व्यक्तीला नक्की करा कारण या दिवशी देवी देवता कोणत्याही रूपा मध्ये येऊन तुमची परीक्षा घेत असतात.
यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू व्यक्तींचा अपमान करून त्यांना परत पाठवू नका. त्याचबरोबर या दिवशी व्यक्तींना किंवा पशुपक्ष्यांना विनाकारण त्रास देणे आपल्याला टाळायचे आहे. यामुळेसुद्धा आपल्या भाग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.